कदंब महामंडळात ११, गोमेकॉत ३ जागांवर होणार भरती

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
3 hours ago
कदंब महामंडळात ११, गोमेकॉत ३ जागांवर होणार भरती

पणजी : कदंब महामंडळात ११ जागा नियमित तर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) ३ जागा कंत्राटी पद्धतीने भरती केल्या जाणार आहेत. कदंब महामंडळातील पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर आहे. गोमेकॉत प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट पदाच्या तीन जागांसाठी थेट मुलाखत ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहेत.

कदंब महामंडळातील ११ पैकी ५ जागा फोरमन, २ जागा सहायक डेपो व्यवस्थापक तर खरेदी नियंत्रक, सहायक आर्थिक नियंत्रक, ईडीपी व्यवस्थापक आणि संशोधक सहायकाच्या प्रत्येकी एका जागेवर भरती होणार आहे. एकूण ११ पैकी ४ जागा आरक्षित असणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती ktclgoa.com आणि www.goa.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 

यासाठीचे अर्ज महामंडळाच्या मुख्य कार्यालयात सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध होतील. इच्छुक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज १५ नोव्हेंबर पर्यंत महामंडळाच्या जमा करावे लागतील. गोमेकॉमध्ये प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट -३ या पदासाठी कंत्राट कालावधी २ वर्षे ११ महिने आहे. यासाठी जीवशास्त्र आणि तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट -३ च्या अन्य एका पदासाठी कंत्राट कालावधी १ वर्षे ५ महिने आहे. यासाठी जीवशास्त्र आणि तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट -२ या पदासाठी कंत्राट कालावधी २ वर्षे ६ महिने आहे. यासाठी विज्ञान विषयासह १२ वी उत्तीर्ण असणे अथवा अभियांत्रिकी पदविका असणे आवश्यक आहे. तसेच चार वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. गोमेकॉतील पदांसाठीचे अर्ज आणि सिव्ही एंडोक्रायनॉलॉजी विभागात अथवा [email protected] या ईमेल वर पाठवावे. निवड केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी ६ नोव्हेंबर रोजी बोलवण्यात येणार आहे.

हेही वाचा