
पणजी : गोवा (Goa) किनारपट्टी विभाग व्यवस्थापन अधिकारिणीने (GCZMA) तार नदीतून गाळ काढण्यासाठी आणि तार-मोइरा जलमार्गामध्ये नेव्हिगेशनसाठी (Tar Moira waterways for navigation) सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, तज्ज्ञ समितीने खारफुटी (Mangrove), जलचराला धोका होऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.
नुकत्याच झालेल्या गोवा किनारपट्टी विभाग व्यवस्थापन अधिकारिणीच्या बैठकीत प्राधिकरणाने जलसंपदा विभागाला (WRD) म्हापसा येथील गिरी ते तार जंक्शन येथील राष्ट्रीय महामार्ग पुलापर्यंत तार-मोइरा नदीच्या जलमार्गाची सुधारणा करण्यासाठी किनारपट्टी नियमन विभागाने (CRZ) परवानगी दिली आहे. मात्र, खारफुटी आणि जलचरांवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेण्यास सूचित केले आहे.
“प्राधिकरणाने सविस्तर चर्चेनंतर प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय घेतला. प्रकल्प हाती घेतलेल्यांनी योग्य काळजी घ्यावी आणि खारफुटी आणि जलचर परिसंस्थेला त्रास होणार नाही याची खात्री करावी,” असे प्राधिकरणाने म्हटले आहे.
गोवा किनारपट्टी विभाग व्यवस्थापन समितीने प्रकल्पाला मंजुरी देण्यापूर्वी जलस्त्रोत खात्याला खारफुटी व नदीच्या पर्यावरणार विशेष लक्ष केंद्रीत करण्यासाठी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (EIA) व अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रस्तावित प्रकल्पाचे ठिकाण दाट झाडीने वेढलेले आहे आणि कायद्यानुसार झुडुपे आणि झाडे तोडण्याची परवानगी नाही. कारण त्यामुळे नदीचे पात्र अस्थिर होऊ शकते.
"खारफुटी, वनस्पती अबाधित राहिली पाहिजे. खारफुटीची परिसंस्था असंख्य जलचर जीवांचे घर आहे आणि म्हणूनच उत्खनन करताना जलचर जीव लक्षात घेऊन अत्यंत खबरदारी आणि काळजी घेतली पाहिजे," असे समितीने म्हटले आहे.
प्रस्तावानुसार, जलमार्गामध्ये प्रस्तावित सुधारणा ज्या ठिकाणी करावयाची आहे ते ठिकाण पूर्णपणे ५० मीटर मॅंग्रोव्ह बफर झोनने प्रभावित आहे. ‘ इंटरटाइडल झोन’ने प्रभावित आहे आणि अंशतः जलसाठ्याने प्रभावित आहे.
"प्रस्तावित जलमार्ग सुधारणा व्याप्तीमध्ये नदीतून एकूण ४४१५ मीटर लांबीत गाळ काढणे समाविष्ट आहे.