आयपीएस अधिकाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे ‘ओशनमॅन इव्हेंट’चे आयोजन

पर्यटन मंत्री, रोहन खंवटे

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
5 hours ago
आयपीएस अधिकाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे ‘ओशनमॅन इव्हेंट’चे आयोजन

पणजी : आयपीएस अधिकाऱ्याच्या (IPS officer) बेजबाबदारपणामुळे पर्यटन खात्याची मान्यता नसतानाही ‘ओशनमॅन इव्हेंट’ आयोजनाचा प्रयत्न झाला. आयपीएस अधिकाऱ्यांनी गोवा (Goa) समजून घेण्यासाठी गोमंतकीयांच्या (Feelings of Goans) भावना जाणून घेण्याची गरज आहे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे (Goa Tourism Minister) म्हणाले. 

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पर्यटन संचालक केदार नाईक उपस्थित होते. करंझाळे समुद्रकिनाऱ्यावर गोव्यातील पारंपरिक (Traditional Goa) रापणकारांचा  मच्छीमारी व्यवसाय चालतो. यामुळे तिथे ‘ओशनमॅन इव्हेंट’ला मान्यता देता येत नाही. पर्यटन खात्याने आयोजकाना दंड ठोठावून कारवाई केली आहे. यापुढे टाऊट व छायाचित्रकार व्यवसाय गोमंतकीयांकडेच राहतील, असे धोरण तयार केले जाईल, असे मंत्रोरी हन खंवटे म्हणाले.

गतवर्षीच्या तुलनेत पर्यटक वाढले

गतवर्षीच्या तुलनेत यंदा सप्टेंबरपर्यंत देशी व विदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशी पर्यटकांचे प्रमाण ५.३६ टक्के, तर विदेशी पर्यटकांचे प्रमाण २९.३३ टक्क्यांनी वाढलेले आहे. ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत ३४ चार्टर विमाने आली आहेत, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले. 


हेही वाचा