५.४० कोटींच्या फसवणूक प्रकरणातून दोघांची मुक्तता

‘सनातन फायनान्सर्स’ कंपनीवरील गुन्हा रद्द

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
31st October, 09:37 pm
५.४० कोटींच्या फसवणूक प्रकरणातून दोघांची मुक्तता

पणजी : गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने फसवणूक प्रकरणात दाखल केलेला गुन्हा गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला. त्यामुळे मुख्य गुन्हा रद्द झाल्याचे निरीक्षण नोंदवून सनातन फायनान्सर्स अँड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसह सुनील कुमार जैन आणि अंकित कुमार जैन यांना मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याच्या आरोपातून मुक्तता केली आहे. याबाबतचा आदेश विशेष न्यायालयाचे (पीएमएलए) न्यायाधीश द्विज्पल पाटकर यांनी दिला आहे.
दिमित्ती सुप्रन्यूक या विदेशी नागरिकाने २०१३ मध्ये केपे पोलीस स्थानकात मूळ तक्रार दाखल केली होती. त्यात त्याने सुनील कुमार जैन आणि अंकित कुमार जैन यांनी केपे येथील प्रकल्पात भागीदारी देण्याची सांगून फसवणूक केल्याची म्हटले होते. त्यानुसार प्रथम केपे पोलिसांनी हा प्रकार दिवाणी स्वरुपाचे असल्याचे नोंदवून गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. त्यानंतर अश्याच प्रकारच्या आणखीन तीन तक्रारी अाल्यानंतर केपे पोलिसांनी कुमार यांच्याविरोधात भादंसंच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर गोवा पोलिसाच्या आर्थिक गुन्हा विभागाकडे (ईओसी) वरील गुन्हे वर्ग केल्यानंतर २१ आॅगस्ट २०२० रोजी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. याच दरम्यान कुमार यांनी विदेशी नागरिकांकडे २१ कंपनी तयार करून केपे येथे प्रकल्प उभारल्याचे म्हटले होते. त्यासाठी विदेशी नागरिकाने ५.४० कोटी रुपयाची फसवणूक झाल्याचे नमूद करण्यात आले होते. मागील अनेक महिने तक्रारदार तपास यंत्रणेला सहकार्य करत नसल्यामुळे यात काहीच होत नव्हता. याची दखल घेऊन सनातन फायनान्सर्स अँड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसह सुनील कुमार जैन आणि अंकित कुमार जैन यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या विरोधात गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. याचिकेची दखल घेऊन फसवणूक प्रकरणी दाखल झालेली तक्रार दिवाणी स्वरूपाची अाहे. या शिवाय तक्रारदार विदेशी नागरिक असून तपास यंत्रणेला सहकार्य करत नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवून गुन्हा रद्द करण्याचा आदेश जारी केला. त्यानुसार, ईओसीने मूळ गुन्हा रद्द केला. दरम्यान वरील प्रकरणाची दखल घेऊन त्यात मनी लाँड्रिंगचा संशय व्यक्त करून सक्तवसुली संचालनालयाने कारवाई सुरु केली होती. त्यानंतर ईडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. याच दरम्यान मूळ गुन्हा रद्द केल्याची माहिती न्यायालयात सादर करण्यात आली. तसेच त्यामुळे पीएमएलए अंतर्गत काहीच कारवाई होऊ शकत नसल्याचा दावा करण्यात आला. याची दखल घेऊन न्यायालयाने वरील सनातन फायनान्सर्स अँड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसह सुनील कुमार जैन आणि अंकित कुमार जैन याच्या विरोधातील मनी लाँड्रिंगचा गुन्ह्याच्या आरोपातून सुटका केली            

हेही वाचा