पूर्ववैमनस्यातून घराला आग : दीड लाखांचे नुकसान

हेडलॅंड, सडा येथील घटना

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
6 hours ago
पूर्ववैमनस्यातून घराला आग : दीड लाखांचे नुकसान

वास्को : हेडलॅंड, सडा, मुरगाव येथे (Mormugao) मालमत्तेच्या वादातून एका व्यक्तीने त्याच्या नातेवाईकाच्या घराच्या मुख्य दरवाजाला आग (Fire) लावली. त्यात दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी आग लावलेल्याची ओळख पोलिसांना (Goa Police) पटली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सडा येथील प्रकाश आंबेकर याने पूर्ववैमनस्यातून आपल्या नातेवाईक शारदा आंबेकर यांच्या घराला आग लावली. त्यात दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. २८ ते २९ ऑक्टोबर दरम्यान आगीचे प्रकरण घडले.

याप्रकरणी मुरगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३३२ (सी) आणि ३२६ (जी) व भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. उपअधीक्षक गुरुदास कदम व पोलीस निरीक्षक शेरीफ जी. यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्टॅनली गोम्स अधिक तपास करीत आहेत. 

हेही वाचा