जिल्हा पंचायत निधीतील प्रकल्प

वास्को : दाबोळी (Dabolim, Goa) विधानसभा मतदारसंघातील चिखली, साकवाळ येथे वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी विकास कामांचे (Development Project) उद्घाटन केले तर नव्या कामांची पायाभरणी (Foundation stone) केली.
जिल्हा पंचायत (South Goa Zilla Panchayat ) निधीतून (Fund) ही विकासकामे करण्यात आली होती. माटावे, दाबोळी येथे पुन्हा बांधण्यात आलेल्या कल्व्हर्टच्या उद्घाटनाने सुरवात करण्यात आली.
त्यानंतर अस्सुई येथे खुल्या जागेत विकास प्रकल्प उभारण्यासाठी पायाभरणी करण्यात आली. हाऊसिंग बोर्ड कॉलनी, झरी, साकवाळ येथे खुल्या जागेत करण्यात आलेल्या सौंदर्यीकरण प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष अनिता थोरात व इतर पदाधिकारी उपस्थित होते.