माजी उपराष्ट्रपतींनी चाखली होती; मांद्रेतील ‘त्या’ दुकानातील चुर्म्याची चव

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
6 hours ago
माजी उपराष्ट्रपतींनी चाखली होती; मांद्रेतील ‘त्या’ दुकानातील चुर्म्याची चव

पेडणे : देऊळवाडा, मांद्रे (Mandrem)  येथील महेश मांद्रेकर यांचे खाजे, मिठाईचे दुकान आहे. पारंपारिक (Traditional) पद्धतीने रुचकर पदार्थ बनवण्याची किमया ते मागची साठ वर्षांपासून करीत आहेत. माजी उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनीही या मिठाई दुकानातील चुर्म्याची चव चाखली होती, अशी आठवण दुकानदार महेश मांद्रेकर मोठ्या अभिनानाने सांगतात.

गोव्याचे (Goa) माजी उपसभापती देऊ मांद्रेकर यांनी देशाचे माजी उपराष्ट्रपती (Ex-Vice President of India) शंकर दयाळ शर्मा यांना या मिठाई दुकानातील चुर्मा पाठवला होता.  आणि त्या काळात या टेस्टी चुरमाची पंडित शंकर दयाळ शर्मा यांनी चांगली स्तुती केल्याची आठवण महेश मांद्रेकर आवर्जून सांगतात. 

 या व्यवसायामध्ये स्थानिकांना रोजगार देण्याबरोबरच ग्राहकांना चांगले खाद्यपदार्थ पुरवावेत याकडे त्यांचा कटाक्ष असतो. 

श्री भगवती सप्तेश्वर पारंपारिक लाडू उद्योग या नावाखाली ते आजही पेडणे तालुक्यातील प्रसिद्ध मांद्रेचा सप्ताह, गावातील जत्रोत्सवात मिठाईचे दुकान थाटतात.  त्यांचे भाऊ, चुलते, पुतणे, पुतण्या इत्यादी घरची मंडळी त्यांना व्यवसायात सहकार्य करतात. 

पारंपारिक व्यवसायाला सरकारने अनुदान द्यावे 

महेश मांद्रेकर म्हणाले सध्या महागाई वाढत आहे. हा पारंपारिक व्यवसाय ही एक कला जे स्थानिक आत्मसात करून व्यवसायाबरोबरच इतरांना रोजगाराच्या संधी देतात. त्या व्यावसायिकांना सरकारने पारंपारिक व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी अनुदान देण्याची गरज आहे. तशा प्रकारची योजना सरकारने आखावी अशी मागणी त्यांनी केली. 

पूर्वी म्हैसूर पाक मुंबई येथून गोव्यात यायचा आणि त्या म्हैसूर पाकाला मोठ्या प्रमाणात मागणी होती. परंतु महेश मांद्रेकर यांच्या दुकानातील म्हैसूर पाक आजही मुंबईला नेला जातो. काही त्यांचे  वार्षिक ग्राहक आहेत. ते मुद्दाम येऊन म्हैसूर पाक नेतात. श्री भगवती सप्तेश्वर मंदिराच्या समोर त्यांचे दुकान आहे. त्या ठिकाणी सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ नियमितपणे उपलब्ध असतात. 

उद्या श्री भगवती सप्तेश्वर देवीचा सप्ताह असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांनी खाजे, चुर्मा, बुंदीचे लाडू, बेसन लाडू, फेनोरे, शंकरपाळी, शेव चिवडा, चुरमा, हलवा असे वेगवेगळे खाद्यपदार्थ त्यांनी आपल्या दुकानात मांडलेले आहेत. आपल्या दुकानातील खास ग्राहक मिठाई घेऊन अन्य राज्यात ही नेतात हे सांगायलाही महेश मांद्रेकर विसरत नाहीत.


हेही वाचा