
चिक्कमंगळूर : कर्नाटकातील (Karnataka) शृंगेरी तालुक्यातील केरेकट्टे येथे शुक्रवारी सकाळी हत्तीच्या (Elephant) हल्ल्यात दोन गांवकरी ठार (Two Villagers Died) झाले. मृतांमध्ये उमेश (४३ वर्षे) आणि हरीश (४२ वर्षे) यांचा समावेश आहे.
दोघेही केरेकट्टे येथील रहिवासी आहेत. हरीश हे भाजप शक्ती केंद्र, केरेकट्टेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
ही दोघेही कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानाच्या (National Park) परिसरात राहतात. शुक्रवारी सकाळी गाईंच्या खाद्यासाठी झाडाची पाने गोळा करण्यासाठी जंगलात गेले असता अचानक हत्तीने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी गेले. पंचनामा करून तपास सुरू केला आहे.