महिनाभरात १५ लाखांचा ड्रग्ज जप्त, २० जणांना अटक

पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा : सीईआयआर पोर्टलद्वारे हरवलेल्या ६७ मोबाईलचा शोध

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
महिनाभरात १५ लाखांचा ड्रग्ज जप्त, २० जणांना अटक

मडगाव : दक्षिण गोवा पोलिसांनी ९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या महिनाभराच्या कालावधीत अमली पदार्थ विरोधी १३ गुन्हे नोंद केले. विविध प्रकारचे १५ लाखांचे ड्रग्ज जप्त केले असून २० संशयितांना अटक केली आहे. तसेच सेंट्रल इक्व्हीपमेट आयडेंटिटी रजिस्टर (सीईआयआर) पोर्टलच्या आधार चोरी झालेले व हरवलेल्या ६७ मोबाईलचा शोध घेण्यात आला, अशी माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी दिली.

दक्षिण गोवा जिल्हा पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी पत्रकार परिषद घेत अमली पदार्थ विरोधी कारवाई व हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत १३ गुन्हे नोंद केले आहेत. यात ८.९१४ किलो गांजा, ४७.७८ ग्रॅम हायड्रोपोनिक वीड व २८.९ ग्रॅम एमडीएमए असा १५ लाख १,५०० रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला. नागरिकांना अमली पदार्थांबाबत काही माहिती मिळाल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही केले.

दक्षिण गोव्यातील विविध पोलीस ठाण्यातून हरवलेले व चोरीचे असे ६७ मोबाईल जप्त करण्यात आले. यात वास्को पोलिसांनी २२, मडगाव पोलिसांनी १३, कोलवा व वेर्णा पोलिसांनी ५, कुडचडे व फोंडा पोलिसांनी प्रत्येकी ६, केपे पोलिसांनी ७, मुरगाव पोलिसांनी २ तर सांगे पोलिसांनी १ मोबाईल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस, नागरिक व टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्या संयुक्त विद्यमाने केली आहे. नागरिकांकडून मोबाईल चोरीच्या आलेल्या तक्रारी सीईआयआर या पोर्टलव्दारे नोंद केल्या जातात. या पोर्टलच्या आधाराने हरवलेले व चोरी झालेले मोबाईल शोधण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी दिली. 

हेही वाचा