ताप येत असलेल्या चौदावर्षीय मुलाचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
ताप येत असलेल्या चौदावर्षीय मुलाचा मृत्यू

मडगाव : दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी आणलेल्या अरसिफ खान या १४ वर्षीय मुलाचा आधीच मृत्यू झाला होता. त्याला चार दिवसांपासून ताप येत होता तसेच उलट्या झाल्याचे चौकशीत समोर आले. वैद्यकीय अहवालात संसर्गामुळे हृदय व श्वसनक्रिया बंद झाल्याचे कारण समोर आले.

फातोर्डा पोलिसांना दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातून माहिती मिळाली. माहितीनुसार, १४ वर्षीय अरसिफ खान याला इस्पितळात आणण्यात आले. त्यावेळी त्याचा मृत्यू झाला होता. फातोर्डा पोलिसांनी अरसिफ खान या मुलाच्या आई राबिया खान यांच्याकडे चौकशी केली असता अरसिफ याला मागील चार दिवस ताप येत होता. १५ रोजी पहाटे चार वाजता अस्वस्थ वाटत असल्याचे मुलाने सांगितले. त्यानंतर सकाळी सहा वाजता त्याला उलट्या होऊ लागल्या. त्याला माडेल मडगाव येथील निवासस्थानाहून इस्पितळात आणण्यात आले असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. उत्तरीय तपासणीअंती शवचिकित्सा अहवालात मुलाचा मृत्यू हा संसर्गामुळे हृदय व श्वसनक्रिया बंद पडल्याने झाल्याचे समोर आले आहे. तपासणीसाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील चौकशी पोलीस उपनिरीक्षक सत्वशील देविदास करीत आहेत. 

हेही वाचा