कोळंबी तवा फ्राय

Story: चमचमीत रविवार |
12th October, 12:08 am
कोळंबी तवा फ्राय

साहित्य:

 कोळंबी (स्वच्छ केलेली)

 हळद

 लाल तिखट

 मीठ

 आले-लसूण पेस्ट

 लिंबाचा रस

 तेल

कृती:

 कोळंबी स्वच्छ करा: कोळंबीची साफसफाई करावी, मागच्या बाजूने एक रेषा तयार करून आतला काळा धागा काढावा. 

 मॅरीनेट करा: एका भांड्यात स्वच्छ केलेली कोळंबी घेऊन त्यात हळद, तिखट, मीठ, आले-लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस घालून चांगले मिसळावे. कोळंबीला कमीत कमी १५-२० मिनिटे मॅरिनेट होऊ द्यावे. 

 शिजवा: एका तव्यावर थोडे तेल गरम करा. 

मॅरिनेट केलेली कोळंबी तव्यावर घाला आणि मंद आचेवर परतून घ्या. 

 कोळंबी रसरशीत होईपर्यंत आणि दोन्ही बाजूंनी चांगली शिजत नाही तोपर्यंत शिजवा. 

 कोळंबीचे पाणी पूर्णपणे आटले आणि ती कुरकुरीत झाली की, कोळंबी तवा फ्राय तयार आहे.


- शिल्पा रामचंद्र