आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ

१ जानेवारीपासून होणार लागू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केल्यानंतर देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. पगार आणि महागाई भत्त्यात (DA) नेमकी किती वाढ होणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. अशातच, एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (DA) ५३ टक्क्यांवरून ५५ टक्के अशी २ टक्क्यांची वाढ होणार आहे. ही वाढ १ जानेवारी, २०२५ पासून लागू होईल.

पगारात थेट किती वाढ?

समजा, एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार ४५,७०० आहे.

* आतापर्यंत त्याला ५३% म्हणजेच २४,२२१ रुपये इतका महागाई भत्ता मिळत होता.

* आता ५५ % वाढीनंतर हाच महागाई भत्ता २५,१३५ रुपये होणार आहे.

* म्हणजेच, कर्मचाऱ्याच्या पगारात थेट ९१४ रुपयांची वाढ होणार आहे!

महागाई जशी वाढते, त्याच प्रमाणात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ताही (DA) वाढतो. ही वाढ वर्षातून दोन वेळा, जानेवारी आणि जुलै महिन्यात होत असते. आगामी काळात लागू होणाऱ्या आठव्या वेतन आयोगाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे आणि सकारात्मक पाऊल मानले जात आहे.


हेही वाचा