मध्य प्रदेश : १.४० कोटींचे कर्ज फेडता न आल्याने भाजप नेत्याच्या मुलाने रचला मृत्यूचा बनाव!

गाडी नदीत ढकलून झाला ‘फरार’; पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यावर अपहरणाचाही रचला बनाव

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
मध्य प्रदेश : १.४० कोटींचे कर्ज फेडता न आल्याने भाजप नेत्याच्या मुलाने रचला मृत्यूचा बनाव!

इंदूर : एखाद्या थ्रिलर चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असे एक धक्कादायक प्रकरण मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात समोर आले आहे. मध्य प्रदेशच्या राजकारणातील बडे प्रस्थ असलेले भाजप नेते महेश सोनी यांच्या मुलाने, विशाल सोनीने १.४० कोटी रुपयांचे बँक कर्ज चुकवण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. मात्र, पोलिसांच्या एका चलाख तपासामुळे त्याच्या यामृत्यू’चे रहस्य उघडकीस आले.

हे प्रकरणसप्टेंबर रोजी पहिल्यांदा समोर आले. पोलिसांना गोपालपुरा येथील कालीसिंध नदीत एक कार बुडाल्याची माहिती मिळाली. मदत पथकाने ती कार बाहेर काढली असता, ती विशाल सोनीची असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, गाडीत कुणीही नव्हते. विशालचा शोध घेण्यासाठी राज्य आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या मदतीने नदीच्या २० किलोमीटरच्या परिसरात मोठी शोधमोहीम राबवण्यात आली, पण कोणताही फायदा झाला नाही.

शोधमोहिमेत काहीच हाती लागत नसल्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी विशालच्या मोबाईल फोनचे रेकॉर्ड तपासले. तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. विशाल महाराष्ट्रात होता! या माहितीच्या आधारे, महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने त्याला संभाजीनगर जिल्ह्यातील फरदापूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. मात्र, पोलिसांना पाहून विशालने पुन्हा एकदा एक नवा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वतःचे कपडे फाडून फरदापूर पोलीस स्थानकात आपल्या अपहरणाची खोटी तक्रार दाखल केली, जेणेकरून पोलिसांची दिशाभूल करता येईल.

चौकशीदरम्यान, विशालने सर्व गुपित उघड केले. त्याने कबूल केले की त्याच्याकडे सहा ट्रक आणि दोन प्रवासी वाहने आहेत, पण त्याच्यावर १.४० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. हे कर्ज माफ करून घेण्यासाठीमृत्यू प्रमाणपत्रमिळवण्याचा सल्ला त्याला कोणीतरी दिला होता. यानुसार, त्याने आपली गाडी नदीत ढकलली. त्यानंतर तो एका ड्रायव्हरच्या मोटरसायकलवरून पळून गेला आणि इंदूरला बस पकडून शिर्डीशनी शिंगणापूरला पोहोचला.

पोलिसांनी सांगितले की, एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव केल्यास त्याला शिक्षा देण्यासाठी कोणताही विशिष्ट कायदा किंवा घटनात्मक तरतूद नाही. त्यामुळे विशालवर कोणताही गुन्हा दाखलकरता त्याला त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा