सातव्या वेतन आयोगाची अखेरची वाढ लवकरच, महागाई भत्त्यातही मोठी वाढ अपेक्षित

५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना होणार फायदा; जानेवारी २०२६ मध्ये आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
सातव्या वेतन आयोगाची अखेरची वाढ लवकरच, महागाई भत्त्यातही मोठी वाढ अपेक्षित

नवी दिल्ली  : यंदाची दिवाळी केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. या दिवाळीच्या मुहूर्तावर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात देखील मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

जुलै २०२५ पासून लागू होणारी ही डीए वाढ दिवाळीच्या आसपास जाहीर केली जाऊ शकते. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना ५५ टक्के महागाई भत्ता मिळत असून, जुलैपासून त्यात ३ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. या वाढीमुळे एकूण महागाई भत्ता ५८ टक्क्यांपर्यंत पोहोचेल. महागाईमुळे त्रस्त असलेल्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी आहे.

या सरकारी निर्णयाचा थेट फायदा ५० लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. सरकार दरवर्षी दोनदा महागाई भत्ता वाढवते - पहिली वाढ जानेवारीमध्ये तर दुसरी जुलैमध्ये लागू होते. जुलै २०२५ ची वाढ अद्याप जाहीर झालेली नसून, दिवाळीनिमित्त सरकार कर्मचाऱ्यांना ही भेट देईल अशी आशा आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाची अखेरची वाढ ठरेल, तर जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा यापूर्वीच झाली आहे.

हेही वाचा