काणकोण: राष्ट्रीय महामार्गावर लोलये-पोळे येथे वेगवान वाहनांच्या धडकेत तब्बल ११ गुरे ठार!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
काणकोण: राष्ट्रीय महामार्गावर लोलये-पोळे येथे  वेगवान वाहनांच्या धडकेत तब्बल ११ गुरे ठार!

काणकोण: काणकोण तालुक्यातील लोलये-पोळे येथील राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात ११ गुरांचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या दोन वाहनांनी धडक दिल्याने ही घटना घडली.

मड्डीतळप (माशे) येथील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विरुद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या मासळी वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांनी या गुरांना चिरडले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पुढील तपास काणकोण पोलीस करत आहेत. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य उपाययोजना करण्याबाबत विचार सुरू आहे.

हेही वाचा