मायना कुडतरी पोलिसांची कारवाई; ११७ ग्रॅम गांजा जप्त
मडगाव: अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी मायना कुडतरी पोलिसांनी दवर्ली येथील तन्वीर मुल्ला (वय ३३) या संशयिताला अटक केली आहे. त्याच्याकडून ११७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे, ज्याची किंमत अंदाजे दहा हजार रुपये आहे.
पोलिसांनी ही कारवाई शुक्रवारी (२० सप्टेंबर) सायंकाळी लयामती डोंगर येथे केली. संशयित तनवीर मुल्लाकडे गांजा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली. झडतीदरम्यान त्याच्याकडे गांजा सापडल्यानंतर पोलिसांनी त्याला अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली अटक केली आहे.
मायना कुडतरी पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर कामत पुढील तपास करत आहेत.