म्हापसा: ६ मीटर खोल खड्ड्यात पडलेल्या इसमाची सुखरूप सुटका

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या संयुक्त प्रयत्नांना यश

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
म्हापसा: ६ मीटर खोल खड्ड्यात पडलेल्या इसमाची सुखरूप सुटका

म्हापसाखोर्ली-म्हापसा येथील चिंतामणी अपार्टमेंटजवळ खोदलेल्या ६ मीटर खोल खड्ड्यात पडलेल्या एका व्यक्तीला म्हापसा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.

माहितीनुसार चिंतामणी अपार्टमेंटमधील रहिवाशांना इमारतीच्या शेजारी एका बांधकाम प्रकल्पाच्या पायासाठी खोदलेल्या खड्ड्यातून आवाज ऐकू आला. तिथे जाऊन पाहिले असता, एक व्यक्ती आत पडलेली दिसली.

यानंतर रहिवाशांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. दोन्ही विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी त्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले.ही घटना दुर्दैवी ठरू शकली असती, पण पोलिस आणि अग्निशमन दलाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ती व्यक्ती कोणतीही गंभीर दुखापत न होता सुरक्षित बाहेर आली.

दरम्यान, नागरिकांनी अशा उघड्या खड्ड्यांजवळ आणि बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन अग्निशमन दल आणि पोलिसांनी केले आहे, जेणेकरून अशा दुर्घटना टाळता येतील.

हेही वाचा