मडगाव : केळशी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम

आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छता दिनानिमित्त विविध संस्थांचा सहभाग; १५ पिशव्या कचरा गोळा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
मडगाव : केळशी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम

मडगाव: आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छता दिनानिमित्त शनिवारी पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय आणि केळशी पंचायतीच्या सहकार्याने केळशी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत विविध संस्थांनी सहभाग घेऊन सुमारे १५ पिशव्या कचरा गोळा केला.

या स्वच्छता मोहिमेमध्ये राज्यातील सहकार विभागाचे कर्मचारी, केळशी पंचायतीचे सदस्य, जैवविविधता समितीचे सदस्य, गोवन सीमन असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य, बोरी फोंडा येथील स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाच्या कॉमर्स कॉलेजच्या एनएसएस विभागाचे विद्यार्थी आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा