'गोंयचो राखणदार' व्हायचेय का विचारून ५ जणांनी केली मारहाण : रामा काणकोणकर
पणजी : सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांना आज दुपारी करंजाळे येथे जबर मारहाण करण्यात आली. 'गोंयचो राखणदार' व्हायचेय का, असे विचारून आपल्याला पाच जणांनी मिळून मारहाण केल्याचा दावा रामा काणकोणकर यांनी केला आहे.
रामा करंजाळे येथे दुपारी जेवायला गेले असताना मारहाणीची घटना घडली. मारहाण करून तोंडाला शेण ही फासण्यात आल्याची माहिती याठिकाणी जमलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिली. यासंदर्भात माहिती देताना रामा काणकोणकर यांनी सांगितले की त्यांना यापूर्वी देखील तिघांनी मिळून मारहाण केली होती. त्यातील एकजण आजच्या मारहाणीत सहभागी होता.
दरम्यान, मारहाणीची घटना घडल्यानंतर घटनास्थळी बरेच लोक जमा झाले. रामा काणकोणकर हे जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते. आपण व इतरांनी मिळून त्याला रस्त्याच्या बाजूला नेल्याचे या महिलेने सांगितले. मारहाणीनंतर रामा काणकोणकर यांनी अनेकांवर आरोप केले आहेत.