हंदूर परिसरात रात्री घडली घटना, अज्ञातांचा शोध सुरू
जोयडा : हंदूर येथे मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर लावलेल्या दोन दुचाकी अज्ञातांनी जाळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने घराला आग न लागल्याने मोठा अनर्थ टळला.
सद्दाम अस्लम सय्यद यांच्या मालकीच्या होंडा आणि सुझुकी कंपनीच्या या दुचाकी होत्या. घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे स्थानिक नेते सुरेश जाधव यांनी तात्काळ हंदूर येथे जाऊन पाहणी केली आणि नंदगड पोलिसांना याची माहिती दिली.
जे कोणी ही कृत्य केले त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुरेश जाधव यांनी केली आहे. यावेळी बसेट्टी सावकार, सुरेश भाऊ, देमान्ना बसरीकट्टी, दीपक कवठनकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. नंदगड पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, अज्ञातांचा शोध घेतला जात आहे.