आल्तिनो-पणजीत बंद घराला आग

३० हजार रुपयांचे नुकसान : अग्निशामक दलाने वाचविली १ लाखांची मालमत्ता

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
42 mins ago
आल्तिनो-पणजीत बंद घराला आग

पणजी : आल्तिनो येथे मंगळवारी पहाटे एका बंद घराला आग लागण्याची घटना घडली. पणजी अग्निशमन दलाने तातडीने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. यात ३० हजार रुपयांचे नुकसान झाले असून १ लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यास दलाला यश आले. पणजी पोलिसांनी घटनेची नोंद केली.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, १६ रोजी पहाटे ५.०५ वाजता आल्तिन्हो येथील एका घराला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती. ही माहिती कक्षाने पणजी अग्निशमन दलाला दिली. त्यानुसार, पणजी फायर स्टेशन ऑफिसर रुपेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली लिडींग फायर फायटर किशोर गावस, ड्राइव्हर ऑपरेटर नितीन शिरोडकर, फायर फायटर समीर कोरगावकर, स्वप्निल परब, लक्ष्मण कोडगीणकर व इतर जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आग इतर ठिकाणी पसरू नये म्हणून अतिरिक्त मदत मागविण्यात आली. दरम्यान, अग्निशमन दलाने त्वरित आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी सदर घर बंद होते. घरातील ३० हजार रुपयांचे नुकसान झाले तर दलाने एक लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश मिळविले. याप्रकरणी पणजी पोलिसांनी आगीची दुर्घटना म्हणून नोंद करून कारवाई सुरू केली आहे. 

हेही वाचा