साहित्य:
चपातीसाठी:
१ मोठा बाऊल गहू पीठ (भिजवून ठेवलेले)
पाणी, तेल, चवीनुसार मीठ
नूडल्ससाठी:
१ पिवळी सिमला मिरची (उभी चिरलेली)
१ हिरवी सिमला मिरची (उभी चिरलेली)
१ गाजर (उभा चिरलेला)
१ बारीक वाटी कोबी (बारीक चिरलेला)
१ मोठा चमचा बारीक चिरलेली लसूण
१ बारीक चमचा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
१ ते २ चमचे व्हिनेगर
१ बारीक चमचा काळी मिरी पूड
१ बारीक चमचा सोया सॉस
१ मोठा चमचा शेजवान सॉस
१ मोठा चमचा रेड चिली सॉस
१ ते २ चमचे टोमॅटो सॉस
चवीनुसार मीठ
खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल
कृती:
१. चपाती तयार करणे:
एका पसरट भांड्यात ३ ते ४ पेले पाणी घ्या आणि त्यात २ ते ३ चमचे तेल घाला. पाणी उकळून घ्या.
भिजवलेल्या गव्हाच्या पिठाचा एक भाग घेऊन जाडसर चपाती लाटा.
ही लाटलेली चपाती उकळत्या पाण्यात सोडा आणि २ ते ३ मिनिटे शिजवून घ्या.
शिजलेली चपाती एका ताटात काढून थंड होऊ द्या. थंड झाल्यावर तिला तेल लावून नूडल्ससारख्या लांब पट्ट्यांमध्ये कापून घ्या.
२. नूडल्स बनवणे:
एका कढईत २ मोठे चमचे तेल गरम करा.
तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेली लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून लसूण सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
आता त्यात चिरलेली पिवळी व हिरवी सिमला मिरची, गाजर आणि कोबी घालून मिक्स करा.
कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर भाज्या शिजवा.
भाज्या शिजल्यावर त्यात व्हिनेगर, काळी मिरी पूड, सोया सॉस, शेजवान सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घाला.
हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.
आता यात कापलेल्या चपातीच्या नूडल्स घालून सर्व सॉस आणि भाज्यांमध्ये नीट मिक्स करा.
अशा प्रकारे, तुमचे पौष्टिक चपाती नूडल्स तयार आहेत! गरम गरम सर्व्ह करा.
संचिता केळकर