स्पर्धा परीक्षांमधील युपीएससी मार्फत घेण्यात येणारी सर्वात मोठी परीक्षा रेल्वे कर्मचारी भरती असते. गोव्याला कोकण रेल्वे, दक्षिण-मध्य रेल्वे, सेन्ट्रल रेल्वे, मुंबईत मेट्रो-लोकल अशी खूप संधी आहे. पण ती घेतली पाहिजे.
ग्रॅज्युएट तसेच बारावी झालेल्या उमेदवारांना भारतीय रेल्वेमध्ये स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विविध पोस्ट भरायच्या आहेत. साधारणपणे ३०,००० पोस्ट यातून भरायच्या आहेत. एन. टी. पी. सी. गॅज्युएट आणि नॉन ग्रॅज्युएट अशा या पोस्ट आहेत. २९ सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत. भारतातील रेल्वेमध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदासाठी उमेदवार भरले जातात. टेक्निकलसाठी डिप्लोमा इंजिनिअर, पदवी इंजिनिअर, टेक्निशिअन, आयटीआय आणि एमटेक तथा आयआयटी पर्यंत शिक्षण असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना कामाची संधी असते. स्पर्धा परीक्षांमधून हे विद्यार्थी निवडले जातात. नॉन टेक्निकल पदांवर इतर विषयातील पदवीधर तसेच १२ वी झालेले उमेदवार घेतले जातात.
रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत भारतात रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड प्रस्थापित केलेले आहेत. गोव्यासाठी मुंबई आरआरबी संस्था काम करते. या अंतर्गत त्या त्या भागातील रेल्वेसाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. अर्थातच भारतातील कोणताही उमेदवार कोणत्याही आरआरबीच्या परीक्षांना बसू शकतो. एनटीपीसी अर्थात नॉन टेक्नीकल पॉप्युलर कॅटेगिरी या पदासाठी सायन्स, आर्टस, कॉमर्सचे पदवीधर तसेच बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना/उमेदवारांना नॉन टेक्निकल पदासाठी निवडले जाते.
यंदा सुमारे ३०,००० पोस्ट भरायचे आहेत. साधारणपणे वय वर्ष १८ ते ३२ वयापर्यंत कितीही वेळा ही परीक्षा देता येते. बहुपर्यायी प्रश्न ( MCQ) पद्धतीने परीक्षा घेतली जाते. ज्याला उत्तर चुकल्यास निगेटिव्ह मार्किंग असते. त्यामुळे नीट अभ्यास करूनच या परीक्षेला बसावे लागते. आरआरबीच्या संकेत स्थळावरून संपूर्ण जाहिरात तसेच अॅप्लिकेशन ऑनलाइन पद्धतीने भरावे लागते. चिफ कमर्शिअल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुडस् ट्रेन मॅनेजर, ज्युनिअर अकाउंट असिस्टंट तथा टायपिस्ट, सिनियर क्लार्क कम टायपिस्ट अशा पोस्ट भरायच्या आहेत. या ऑफिसर ग्रेडच्या पोस्ट 'सी' प्रकारात मोडणाऱ्या पोस्ट आहेत.
यांची परीक्षा तीन स्तरांवर होते. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (स्क्रिनिंग), कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (मेन) आणि स्किल टेस्ट/टायपिंग/ मेडिकल अशा पद्धतीने परीक्षा घेतली जाते. सीबीटी -१ मध्ये दीड तासात १०० बहुपर्यायी प्रश्न सोडवावे लागतात. यात १/३ निगेटिव्ह मार्किंग असते. सामान्य ज्ञान, गणित, तर्कनिष्ठ आणि बुद्धिमत्ता यावर प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा पास झाली की सीबीटी-२ ला बसावे लागते. यात परत दीड तासात १२० प्रश्न सोडवायचे असतात. इथेही निगेटिव्ह मार्किंग असते. पास झाले की पुढे स्किल टेस्ट आणि सिलेक्शन होते व पोस्टिंग होते.
गणितामध्ये नंबर सिस्टम, डेसिमल, फॅक्शन, एलसीएम्, एचसीएफ्, रेशो आणि प्रोपोरशन, मेन्सुरेशन, टाईम अन वर्क, टाईम आणि डिस्टंस, प्रॉफिट-लॉस, सिंपल अन कंपाउंड, इंटरस्ट, जोमेट्री, स्टॅटीस्टीक,अल्जेब्रा, ट्रिगनोमेट्री, अनॅलॉजी, कोडींग, डीकोडींग, पझल्स, डायरेक्शन, ब्लड रिलेशन, रॅकींग, डिसिजन मेकिंग, स्टेटमेंट अन् असंप्शन्स, करंट अफेयर्स, इतिहास, भूगोल, विज्ञान (दहावीपर्यंतचे) असे विषय असतात. नियमित सराव आणि मार्गदर्शन घेतले की विषय पक्के होतात.
आरआरबीच्या वेबसाईटवर जावे. तिथे सर्व नोटिफिकेशन नीट वाचणे, फॉर्म भरणे, ऑनलाइन पाठवणे, परीक्षा व सिलॅबसची संपूर्ण माहिती तिथे असते. परीक्षा कधी, कुठे, सर्वच्या सर्व पीडीएफ नोटिफिकेशनमध्ये असते. रेल्वे ही सेंट्रल गव्हरमेंट जॉब आहे. चांगला पगार, रहायला क्वॉर्टर्स, खूप सुविधा-सवलती, पेन्शन इथे मिळते. भारतात १५ लाख लोक रेल्वेमध्ये कामाला आहेत. जणू भारतात अख्खा गोवा इथे काम करतो. कारण गोव्याची लोकसंख्या तेवढीच आहे. परंतु रेल्वेत एकही गोमंतकीय औषधाला देखील सापडणार नाही. काही अपवाद असतील. परंतु खूपश्या मुलांना याचे एक तर ज्ञान नाही किंवा आकर्षण नाही.
स्पर्धा परीक्षांमधील युपीएससी मार्फत घेण्यात येणारी सर्वात मोठी परीक्षा रेल्वे कर्मचारी भरती असते. गोव्याला कोकण रेल्वे, दक्षिण-मध्य रेल्वे, सेन्ट्रल रेल्वे, मुंबईत
मेट्रो-लोकल अशी खूप संधी आहे. पण ती घेतली पाहिजे. नुसते मला गोव्यातच नोकरी, ते पण सरकारी, ती पण घराजवळ, ती पण निवांत, ती पण मलिदावाली अशीच मिळाली पाहिजे हा नाद तरुणांनी आत्ता तरी सोडावा. गाव सोडावा मग बघा अख्ख्या भारतात आपण नाव करू शकता. रेल्वेच्या या संधीचा फायदा तरी घ्या. ही एक परीक्षा देऊन तरी बघा.
अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि
करिअर समुपदेशक आहेत.)