सांगे येथील संगमपूर गणेशोत्सव मंडळाचा ‘लकी ड्रॉ’ जाहीर

सांगे : केवळ ५०० रुपयांचे लॉटरीचे तिकीट घेऊन लाखो रुपयांचा फ्लॅट मिळण्याची संधी गोव्यातील संगमपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी देण्यात आली. या लॉटरीचा लकी ड्रॉ शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यात पहिल्या दोन क्रमांकांच्या विजेत्यांना टू बीएचके फ्लॅट बक्षीसस्वरूपात मिळाला आहे.
पहिला क्रमांक – 094879 असा असून हा 2 BHK Flat फातोर्डा, मडगाव येथील इमारतीत आहे. या फ्लॅटसोबतच ३५ लाख रुपयांची रोख रक्कमही पारितोषिक स्वरूपात या विजेत्याला मिळणार आहे.
दुसरा क्रमांक – 139630 असा असून हा 2 BHK Flat कुडचडे येथील इमारतीत आहे. या फ्लॅटसोबतच २९.५० लाख रुपयांची रोख रक्कमही पारितोषिक स्वरूपात या विजेत्याला मिळणार आहे.
याशिवाय १८ विजेत्यांना आलीशान कार देण्यात येणार आहेत. या लॉटरीचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे...
