ओमानमध्ये अडकलेल्या दिलेशसाठी विरियातो यांचा केंद्रीय मंत्र्यांशी पत्रव्यवहार

ओमानमध्ये संकटात सापडलेल्या मुरगावातील दिलेश चंद्रकांत तेली यांना सुखरूप मायदेशी परत आणावे; अशी मागणी दक्षिण गोवा जिल्ह्याचे खासदार कैप्टन विरियातो फर्नांडीस यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर यांच्याशी पत्रव्यवहार करून केली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
ओमानमध्ये अडकलेल्या दिलेशसाठी विरियातो यांचा केंद्रीय मंत्र्यांशी पत्रव्यवहार

वास्को : ओमानमध्ये संकटात सापडलेल्या मुरगावातील दिलेश चंद्रकांत तेली यांना सुखरूप मायदेशी परत आणावे; अशी मागणी दक्षिण गोवा जिल्ह्याचे खासदार कैप्टन विरियातो फर्नांडीस यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर यांच्याशी पत्रव्यवहार करून केली आहे.

१६ ते १७ नोव्हेंबर दरम्यान हॉर्मुझ समुद्रात 'तारा गॅस' या पनामा ध्वजांकित एलपीजी टँकरवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी २४ भारतीय नागरिकांसह एकूण २५ क्रू सदस्य जहाजात होते. त्यांनी समुद्रात उडी मारून आपला जीव वाचवला होता. या जहाजात मुुरगाव, गोव्यातील दिलेश तेली यांचा पासपोर्ट, फोन, वैयक्तिक सामान आणि कागदपत्रे हरवली आहेत व तो तसाच ओमानमध्ये अडकला आहे.

त्यांचे कुटुंबीय चिंतेत असून, आपण कळकळीची विनंती करतो की, यात हस्तक्षेप करून दिलेश तसेच इतर भारतीय नागरिकांना सुखरूप आपल्या मायदेशी आणावे, असे खासदार ‌विरियातो यांनी या पत्रात नमूद केले आहे.