उद्या मतमोजणीनंतर होणार निकाल जाहीर
मतदानाचा हक्क बजावताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवड करण्यासाठी रविवारी मतदान पार पडले. १३ पैकी ९ जागांसाठी मतदान घेण्यात आले. सर्वच गटांत ९० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. मतमोजणी होऊन मंगळवारी निकाल जाहीर केला जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोलीत, तर त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी फोंडा येथे मतदान केले.
गोवा राज्य सहकारी बँकेच्या १३ संचालकांपैकी ४ जाणांची बिनविरोध निवड झाली आहे. रविवारी ९ जागांसाठी मतदान घेण्यात आले. मतदान बँकेच्या पेडणे, म्हापसा, पणजी, डिचोली, सांगे, केपे, काणकोण आणि वास्को या शाखांमध्ये आयोजित करण्यात आले होते. याशिवाय वाळपई सरकारी शाळा, सहकार भवन कुर्टी, धारबांदोडा मल्टीपर्पज सोसायटी, फातोर्डा साहाय्यक निबंधक कार्यालातही मतदानाचे आयोजन केले होते.
निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार
सेवा सहकारी संंस्था गट : अॅड. उपासो गावकर (पारोडा), कृष्णा कुडणेकर (मेरशी), विनायक नार्वेकर (माशेल), विठ्ठल वेर्णेकर (डिचोली)
पगारदार सहकारी संंस्था गट (उत्तर गोवा) : राम चोर्लेकर (नगरगाव वाळपई), प्रिया टंगसाळी (पेडणे)
पगारदार सहकारी संंस्था गट (दक्षिण गोवा) : शाबा देसाई (वारखंडे), संंजय सावंत देसाई (मडगाव)
ग्राहक आणि विपणन संंस्था गट : श्रीकांत नाईक (कवळे फोंडा), प्रकाश वेळीप (केपे)
डेअरी सहकारी संंस्था गट : रमेश एडथडन (मेरशी), विजयकांत गावकर (सांगे), विकास प्रभू (फोंडा)
गृहनिर्माण सहकारी संंस्था गट : दादी नाईक (शिरोडा), वासुदेव परब (पिसुर्ले सत्तरी)
व्यक्तिगत गट : चंद्रशेखर कुसनूर (कुडका, गोवा वेल्हा), पांडुरंग कुर्टीकर (कोठंबी पाळी)