आप गोव्यातील चाळीसही जागा लढविणार : आतिशी

आप ईंडी आघाडीचा भाग नाही

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
17th August, 05:02 pm
आप गोव्यातील चाळीसही जागा लढविणार : आतिशी

पणजी : काँग्रेस हा विरोधी आघाडीतील मोठा घटक पक्ष असला तरी तो विरोधकाची भूमिका बजावत नाही. काँग्रेसवर विश्वास ठेवणे कठीण असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी गोव्यातील चाळीसही जागांंवर उमेदवार उभे करणार आहे, असे आपच्या नेत्या आतिशी यांनी स्पष्ट केले आहे. प्रुडंट मीडीयाच्या हेड ऑन मुलाखतीत बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली. प्रुडंट मीडियाचे संपादक संचालक प्रमोद आचार्य यानी ही मुलाखत घेतली.

गोव्यात २०२२मध्ये विधानसभा निवडणूक झाली. गोव्यात काँग्रेसला ११ जागा मिळाल्या तर आपला २ जागा मिळाल्या. आता काँग्रेसचे केवळ ३ आमदार आहेत तर आपचे २ आमदार आहेत. काँग्रेसवर विश्वास कसा ठेवायचा? काँग्रेस पक्ष हा भाजपला सत्तेवर येण्यास मदत करत आहे. विरोधकांची भूमिका बजावण्यात काँग्रेसला अपयश आले आहे. आप हा सध्या तरी ईंडी आघाडीचा घटक पक्ष नाही. गोव्यात काँग्रेसला आपशी युती हवी असेल तर त्यांनी योग्य असा प्रस्ताव सादर करायला हवा. सध्या तरी आपची गोव्यातील चाळीसही जागा लढविण्याची तयारी आहे, असे आतिशी यांनी स्पष्ट केले.