पणजी : सावर्डे-सत्तरी येथे नदीवर नवा पूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ३२ कोटी रुपये खर्च येणार असून गोवा पायाभूत साधन सुविधा विकास महामंडळाने निविदा जारी केली आहे. पैकुळ पुलाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांनी सावर्डे येथे नवा पूल उभारणार असे जाहीर केले होते.
जीएसआयडीसीने पात्र कंत्राटदारांकडून निविदा मागवल्या असून १७ सप्टेंबरला निविदा उघडण्यात येईल. ज्या बांधकाम कंपनीची निवड होईल त्या कंपनीने कामाचे लेखी पत्र दिल्यानंतर अठरा महिन्यांत म्हणजे दीड वर्षांत पुलाची उभारणी करायची आहे.
सध्याच्या जूना पूल हा १९८८ साली पूर्ण झाला होता. आता काळाप्रमाणे वाहतुकीमध्ये वाढ झाली त्यामुळे नव्या पुलाची आवश्यकता असून आता सरकारने त्यासाठी 32 कोटी रुपये खर्चाची निविदा जारी केली आहे. मुळात हा पूल अरुंद आहे. मोठी वाहने त्यावरून जात नाही. त्यासाठी नव्या पुलाची मागणी स्थानिकांकडून सातत्याने केली जात.