पं. शिरगांवकर स्मृती पुरुष भजन स्पर्धा : नादोडाच्या श्री दाडेश्वर कला केंद्राला दुसरे बक्षीस
पं. मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती पुरुष भजन स्पर्धेचे विजेते श्री सातेरी केळबाय भजनी मंडळाच्या सदस्यांसोबत मान्यवर.
पणजी : कला अकादमीने आयोजित केलेल्या पं. मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती २०२५-२६ राज्यस्तरीय पुरुष भजन स्पर्धेत लाडफेतील श्री सातेरी केळबाय कला आणि सांस्कृतिक मंडळ प्रथम पारितोषिकाचे (७५ हजार रुपयांचे) मानकरी ठरले. नादोडा-बार्देश येथील श्री दाडेश्वर कला केंद्राने द्वितीय पारितोषिक (५० हजार रुपयांचे) पटकावले. विर्नोडा-पेडणे येथील श्री दाडेश्वर मूळवीर कला व सांस्कृतिक मंडळाने तृतीय (४० हजार), तर बांदोडा-फोंडा येथील श्री दादा महाराज भजनी मंडळाने चौथे (३० हजार रुपये) स्थान पटकावले.
पणजीतील मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात १५ ऑगस्ट रोजी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. सदर स्पर्धा जुलैमध्ये पार पडली होती. दरम्यान, स्पर्धेतील उत्तेजनार्थ (रु. २० हजार) दोन पारितोषिके प्रत्येकी श्री शांतादुर्गा लक्ष्मी नृसिंह सांखळ्यो भजनी मंडळ, सांकवाळ, श्री विजयादुर्गा भजनी मंडळ इंफाळ, प्रियोळ-फोंडा यांना देण्यात आली.
वैयक्तिक पारितोषिके
* उत्कृष्ट गायक (पहिला अभंग) : प्रथम - अरुणदत्त रघुनाथ परब (श्री सातेरी केळबाय कला आणि सांस्कृतिक मंडळ, लाडफे, डिचोली), द्वितीय - विवेक लाडू नाईक (श्री दादा महाराज भजनी मंडळ, बांदोडा-फोंडा)
* उत्कृष्ट गायक (दुसरा अभंग) : प्रथम - गौरीश रामा नाईक (दांडेश्वर कला केंद्र, नादोडा, बार्देश), द्वितीय - पंकज प्रकाश सावंत (दाडेश्वर मुळवीर कला व सांस्कृतिक मंडळ, विर्नोडा, पेडणे)
* उत्कृष्ट गवळण गायक कलाकार : प्रथम - गोविंद लक्ष्मण गावकर (सातेरी केळबाय मंडळ, लाडफे, डिचोली), द्वितीय - अनिल गुरव (श्री शांतादुर्गा लक्ष्मी-नृसिंह सांखळ्यो भजनी मंडळ, सांकवाळ)
* उत्कृष्ट संवादिनी साथी : प्रथम - अक्षय अ. गावडे (श्री विजयदुर्गा भजनी मंडळ, इंफाळ, प्रियोळ, फोंडा), द्वितीय - विद्धेश विनायक पिळर्णकर (ओम शिवशंभो संगीत विद्यालय, मेरशी, तिसवाडी)
* उत्कृष्ट पखवाज साथी : प्रथम - मयुर मुकुंद गावडे (दाडेश्वर मुळवीर कला मंडळ, विर्नोडा, पेडणे). द्वितीय - मंजित भिकारो पर्वतकर (श्री दादा महाराज भजनी मंडळ, बांदोडा, फोंडा) अशी पारितोषिके देण्यात आली नाहीत.