कर्नाटक : बंगळुर ते मंगळुर रेल्वेमार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन

मुसळधार पावसाचा फटका; वाहतूक ठप्प

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
50 mins ago
कर्नाटक : बंगळुर ते मंगळुर रेल्वेमार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन

जोयडा : पश्चिमघाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बंगळुर ते मंगळुर या रेल्वेमार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

 



सकलेशपूर तालुक्यातील एडकुमारी परिसरात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने प्रवासी तसेच मालगाड्यांची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. रेल्वे विभागाच्या माहितीनुसार, तब्बल ७ किलोमीटरच्या पट्ट्यात १५ ठिकाणी भूस्खलन झाले असून, रुळांवर पाणी साचले आहे.




यामुळे श्रीवागिलु ते एडकुमारी, एडकुमारी ते कडगरवळी आणि कडगरवळी ते डोणिगल या विभागांदरम्यान रेल्वे मार्ग बंद झाला आहे. रेल्वेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर सुरू करण्यात आला आहे.


( बातमी अपडेट होत आहे ) 


हेही वाचा