पं. शिरगांवकर स्मृती महिला भजन स्पर्धा : केरीच्या श्री आजोबा कल्चरलला दुसरे स्थान
पं. मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती महिला भजन स्पर्धेत भजन सादर करताना मयडेतील श्री राम सेवा संघ महिला भजनी मंडळ.
पणजी : कला अकादमीने आयोजित केलेल्या पं. मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती २०२५-२६ राज्यस्तरीय महिला भजन स्पर्धेत मयडेतील श्री राम सेवा संघ महिला भजनी मंडळ प्रथम पारितोषिकाचे (३५ हजार) मानकरी ठरले. केरी-सत्तरीतील श्री आजोबा कल्चरल असोसिएशनने द्वितीय पारितोषिक (३० हजार) पटकावले. कारापूर-साखळी येथील श्री शांतादुर्गा भजनी मंडळाने तृतीय (२५ हजार), तर पर्वरी-बार्देश येथील हनुमान सांस्कृतिक महिला मंडळाने चौथे (२० हजार) स्थान पटकावले.
पणजीतील मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात १३ ऑगस्ट रोजी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. सदर स्पर्धा जुलैमध्ये पार पडली होती. दरम्यान, स्पर्धेतील उत्तेजनार्थ (रु. १० हजार) दोन पारितोषिके प्रत्येकी श्री शिवसमर्थ सांस्कृतिक मंडळ, वास्को आणि श्री केळबाय सातेरी महिला भजनी मंडळ, कुर्टी-फोंडा यांना देण्यात आली. वैयक्तिक पारितोषिके
* उत्कृष्ट गायिका (पहिला अभंग) : प्रथम - दिव्या पांडुरंग च्यारी (श्री राम सेवा संघ), द्वितीय - दिशा शांतादीप कर्तीकर (श्री केळबाय सातेरी महिला भजनी मंडळ)
* उत्कृष्ट गायिका (दुसरा अभंग) : प्रथम - ऋतुजा घनःश्याम च्यारी (श्री राम सेवा संघ), द्वितीय - प्रभावी रमेश होन्नावरकर (श्री हनुमान महिला भजनी सांस्कृतिक संस्था, नॉन-मॉन, वास्को)
* उत्कृष्ट गवळण गायक कलाकार : प्रथम - तेजस्वी महेंद्र हळीत (श्री आजोबा कल्चरल असोसिएशन), द्वितीय - अलिशा प्रदीप सिमेपुरुषकर (हनुमान सांस्कृतिक महिला मंडळ, पर्वरी)
* उत्कृष्ट संवादिनी साथी : प्रथम - श्रुती उत्तम म्हालकर (श्री आजोबा कल्चरल असोसिएशन), द्वितीय - शलाका शंकर चव्हाण (श्री हनुमान महिला भजनी सांस्कृतिक संस्था, नॉन-मॉन, वास्को)
* उत्कृष्ट पखवाज साथी : प्रथम आणि द्वितीय अशी दोन्ही पारितोषिके देण्यात आली नाहीत.