एससीईआरटीकडून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कार्यवाही सुरू झाल्यानंतर आता तिसरी ते आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना समान सामायिक परीक्षा होणार आहे. प्रश्नपत्रिका गोवा राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळ (जीएससीईआरटी) काढणार आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी एकाच वेळी परीक्षा होईल. परीक्षेचे वेळापत्रक जीएससीईआरटीने जारी केले आहे. इयत्ता तिसरी आणि चौथीची परीक्षा ९ ते १५ ऑक्टोबरपर्यंत होणार आहे.
परीक्षांचे वेळापत्रक
इयत्ता तिसरी : ९ ऑक्टोबर कोंकणी/मराठी, १० ऑक्टोबर इंग्लिश/कन्नड/उर्दू/हिंदी, १३ ऑक्टोबर गणित, १५ ऑक्टोबर द वर्ल्ड अराऊंड अस.
इयत्ता चौथी : ९ ऑक्टोबर इव्हीएस, १० ऑक्टोबर गणित, १३ ऑक्टोबर इंग्लिश, १५ ऑक्टोबर मराठी/कोकणी/उर्दू/कन्नड/हिंदी.
इयत्ता पाचवी : ९ ऑक्टोबर इंग्लिश, १० ऑक्टोबर गणित, १३ ऑक्टोबर हिंदी, १४ ऑक्टोबर इव्हीएस, १५ ऑक्टोबर मराठी/कोकणी.
इयत्ता सहावी : ८ ऑक्टोबर इंग्लिश, ९ ऑक्टोबर सायन्स, १० ऑक्टोबर मराठी/कोकणी/संस्कृत/उर्दू/हिंदी/कन्नड, १३ ऑक्टोबर गणित, १४ ऑक्टोबर समाजशास्त्र, १५ ऑक्टोबर मराठी/कोकणी.
इयत्ता सातवी : ७ ऑक्टोबर गणित, ८ ऑक्टोबर मराठी/कोकणी/कन्नड/उर्दू/संस्कृत, ९ ऑक्टोबर हिंदी, १० ऑक्टोबर विज्ञान, १३ ऑक्टोबर समाजशास्त्र १, १४ ऑक्टोबर इंग्लिश, १५ ऑक्टोबर समाजशास्त्र २.
इयत्ता आठवी : ७ ऑक्टोबर इंग्लिश, ८ ऑक्टोबर समाजशास्त्र २, ९ ऑक्टोबर समाजशास्त्र १, १० ऑक्टोबर मराठी/कोकणी/संस्कृत/उर्दू/हिंदी/कन्नड/पोर्तुगीज/फ्रेंच, १३ ऑक्टोबर विज्ञान, १४ ऑक्टोबर हिंदी, १५ ऑक्टोबर गणित.