दूध बर्फी

रक्षाबंधन म्हटल्यानंतर सुगरणींच्या कल्पकतेला सीमा उरत नाही. पण ज्यांना स्वयंपाक करता येत नाही त्यांनी काय करावे? त्यांच्यासाठी घेऊन आली आहे पौष्टिक, स्वादिष्ट आणि करायला सोपी अशी दूध बर्फी. एकदा करून तर बघा, सगळे तुमची प्रशंसा करतीलच!

Story: गोडगोड रविवार |
10th August, 12:30 am
दूध बर्फी

साहित्य

दूध पावडर- २ वाटी
इनो- अर्धा चमचा
केशर- अर्धा चमचा
वेलची पावडर- १ चमचा
पिठी साखर- १ चमचा

कृती

दूध पावडरमध्ये केशर, इनो व वेलची पावडर घालून थोडे पाणी घालून ढोकळ्याच्या पिठापेक्षा थोडं घट्ट भिजवावं. ताटलीला तूप लावून त्यावर हे मिश्रण पसरवून पाच ते सात मिनिटे वाफवून घ्यावे. थंड झाल्यावर वड्या पाडून वरून पिठीसाखर भुरभूरावी.

 हवे असल्यास वाफवायच्या अगोदर मिश्रणात हवा असलेला इसेन्स घालावा. म्हणजे या बर्फीला वेगळा फ्लेवरही मिळू शकतो.


संचिता केळकर