कॉर्पोरेशनवर कामासाठी विसंबणे म्हणजे वेळ आणि उर्जा वाया घालवणे : गडकरींचा टोला

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
28th July, 11:28 am
कॉर्पोरेशनवर कामासाठी विसंबणे म्हणजे वेळ आणि उर्जा वाया घालवणे : गडकरींचा टोला

नागपूर : “सरकारी व्यवस्था म्हणजे चालू गाडी पंक्चर करणारी यंत्रणा आहे,” अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी यंत्रणेवर जोरदार टीका केली आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या शैलीत सरकारी प्रणालीतील अकार्यक्षम, वेळकाढू कारभारावर बोट ठेवले.  माझे स्वप्न आहे की नागपूरमध्ये मुलांसाठी ३०० मैदाने आणि स्टेडियम उभारावीत. पण गेल्या चार वर्षांच्या अनुभवातून समजले की कॉर्पोरेशन किंवा एनआयटीवर कामासाठी विसंबणे म्हणजे वेळ आणि उर्जा वाया घालवणे, असे गडकरी म्हणाले. 


सरकारी सिस्टीममध्ये एक विशेष कौशल्य आहे, ते चालू गाडी पंक्चर करण्यात पटाईत आहे. म्हणजेच एखादे चांगले काम सुरू असेल तरी त्यात अडथळा आणणे हेच त्यांच्या कामाचे स्वरूप बनले आहे, असे ते पुढे म्हणाले. 

राजकारणातील ‘फुकट संस्कृती’वरही गडकरींनी निशाणा साधला. आजकाल सगळ्यांना राजकारणात सगळे काही मोफत हवे असते, जणू काही ही ‘फुकटसाठीची बाजारपेठ’ आहे, असे टोला त्यांनी लगावला. गडकरींचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचे  कौतुकही होत आहे. मात्र, यंत्रणांच्या अकार्यक्षमतेबाबत त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहेत.


हेही वाचा