पणजीः राज्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. गोवा कर्मचारी भरती आयोगाकडून विविध विभागांमध्ये सुमारे ४८० नोकरीच्या पदांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती लेखापाल, विक्रीकर अधिकारी, अभियंता, स्टेशन अधिकारी यांसारख्या महत्त्वाच्या पदांसाठी होणार आहे.
लेखापाल (Accountant) – २२ पदे
सहाय्यक विक्रीकर अधिकारी (Asst. Sales Tax Officer) – ०९ पदे
विक्री निरीक्षक (Sales Inspector) – ३४ पदे
कनिष्ठ अभियंते (यांत्रिक/विद्युत) – ११३ पदे
कनिष्ठ अभियंते (स्थापत्य) – १३२ पदे
विस्तार अधिकारी (Extension Officer) – १२ पदे
स्टेशन अधिकारी – ३५ पदे
लाइनमन / मीटर रीडर – ६६ पदे
या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून, पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.