आंध्र प्रदेश विधानसभेत २५ वर्षांहून अधिक काळ भूषवले आमदार पद
पणजी : माजी केंद्रीय मंत्री पुसापती अशोक गजपती राजू हे २६ जुलै रोजी गोव्याच्या राज्यपालपदाची (Governor of Goa) धुरा सांभाळणार आहेत. राजभवनावर २६ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या शपथविधी होईल. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे हे त्यांना राज्यपालपदाची शपथ देतील.
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या जागी पुसापती अशोक गजपती राजू यांची नेमणूक करण्याचा आदेश राष्ट्रपतींनी १४ जुलै रोजी जारी केला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr.Pramod Sawant) यांच्यासह इतर मंत्री व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यानी राजू यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.
आंध्र प्रदेश विधानसभेत २५ वर्षांहून अधिक काळ आमदार असलेले पुसापती अशोक गजपती राजू हे २०१४ ते २०१८पर्यंत केंद्रीय मंत्री होते. तेलगू देसम तसेच भारतीय जनता पक्षासाठी त्यांनी बरीच वर्षे कार्य केले आहे.
पिल्लईंचा कार्यकाळ चार वर्ष
पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोव्याचे १९वे राज्यपाल म्हणून १५ जुलै २०२१ रोजी शपथ घेतली होती. गोव्याचे राज्यपाल म्हणून चार वर्षांचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला.