कर्मचारी भरती आयोगाची जाहिरात : अर्ज करण्याची मुदत ८ ऑगस्ट
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : अकाऊंटंट, साहाय्यक शुल्क अधिकारी, कनिष्ठ अभियंते अशा १९ प्रकारच्या ४३९ पदांसाठी गोवा कर्मचारी भरती आयोगाने जाहिराती दिल्या आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ८ ऑगस्ट २०२५ ही अंतिम मुदत आहे. अर्ज करण्यासाठीच्या सूचना, शैक्षणिक पात्रता, तसेच अटींची माहिती https://gssc.goa.gov.in या संंकेतथळावर उपलब्ध आहे.
सर्व खात्यांंमधील कर्मचाऱ्यांंची भरती गोवा कर्मचारी भरती आयोगामार्फत होते. यावर्षी बंंपर भरतीसाठीची ही दुसरी जाहिरात आहे. यापूर्वी मे महिन्यात साहाय्यक शिक्षक, ग्रंंथपाल, पीएसआय ही पदे भरण्यासाठीची जाहिरात आयोगाने दिली होती. या पदांंसाठी अर्ज करण्याची मुदत पूर्ण झाली आहे; मात्र परीक्षा होणार आहेत.
सर्वाधिक पदे अभियंंत्यांंची
जाहिरात दिलेल्या ४३९ पैकी निम्याहून अधिक, म्हणजे २४५ पदे कनिष्ठ अभियंंत्यांंची आहेत. सार्वजनिक बांधकाम, वीज, ग्रामीण विकास, जलस्रोत, कृषी आणि पंंचायत संंचालनालय या खात्यांमध्ये कनिष्ठ अभियंंत्यांंची भरती केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल मिळून २५ कनिष्ठ अभियंंत्यांंची भरती होणार आहे. संबंधित (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल) शाखेत पदवी वा पदविका अभ्यासक्रमासह कोकणीचे ज्ञान या पदांंसाठी आवश्यक आहे. एससी १, एसटी २, ओबीसी २, इडब्ल्यूएस ५ पदे आरक्षित आहेत. सामान्यांंसाठी १५ पदे आहेत. याशिवाय २ पदे दिव्यांंगांंसाठी आहेत.
कनिष्ठ अभियंंत्यांंची (वीज) ८८ पदे वीज आणि ग्रामीण विकास खात्यात भरली जाणार आहेत. ८८ पैकी ८७ पदे वीज खात्यात, तर १ पद ग्रामीण विकास खात्यात आहे. ८८ पदांंपैकी एसटी १०, एससी १, ओबीसी २३, इडब्लूएस ८, तर सामान्यांसाठी ४६ पदे आहेत.
कनिष्ठ अभियंंते (सिव्हिल) १३२ पदे आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यात ७७, कृषी खात्यात २, वीज खात्यात १, पंंचायत खात्यात १०, जलस्रोत ३९ आणि ग्रामीण विकास खात्यात ३, अशी एकूण १३२ पदे आहेत. एसटी १६, एससी १, ओबीसी ३३, इडब्लूएस १५ आणि सामान्य गटात ६७ पदे आहेत.
व्यावसायिक शुल्क खात्यात ४३ पदे
व्यावसायिक शुल्क खात्यात (कमर्शियल टॅक्स) साहाय्यक शुल्क अधिकाऱ्याची ९, तर शुल्क निरीक्षकाची ३४ पदे भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. दोन्ही पदांसाठी वाणिज्य शाखेत पदवी आवश्यक आहे. साहाय्यक शुल्क अधिकाऱ्याच्या ९ पदांंपैकी एसटी २, ओबीसी ४, इडब्ल्यूएस १, तर सर्वसामान्यांसाठी २ पदे आहेत. राज्य शुल्क निरीक्षकाची (टॅक्स इन्स्पेक्टर) एसटी ४, एससी १, ओबीसी १०, इडब्लूएस २, तर सामान्य गटासाठी १७ पदे आहेत.
लाईनमन ३५, मीटर रीडरची ३१ पदे
वीज खात्यात लाईनमनची ३५, तर मीटर रीडरची ३१ पदे भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. स्टेशन ऑपरेटरची ३५ पदे भरली जाणार आहेत. वायरमनसाठी एनसीव्हीटीचे इलेक्ट्रिशियन प्रमाणपत्र, तर मीटर रीडरसाठी आयटीआय इलेक्ट्रिशियन ट्रेड प्रमाणपत्र आवश्यक आहे. लाईनमनच्या ३५ पैकी सामान्यांंसाठी २०, एसटी ३, ओबीसी ९ आणि इडब्ल्यूएससाठी ३ पदे राखीव आहेत. मीटर रीडरच्या ३१ पैकी एसटी २, एससी १, ओबीसी ७, इडब्ल्यूएस ३, तर सामान्यांंसाठी १८ पदे आहेत. स्टेशन ऑपरेटरच्या ३५ पैकी एसटी ३, एससी १, ओबीसी १०, इडब्ल्यूएस ३, तर सामान्य गटात १८ पदे आहेत.
लेखा संंचालनालयात अकाऊंटंंटची २२ पदे
लेखा संंचालनालयात अकाऊंटंंटच्या २२ पदांंसाठी भरती होईल. या २२ पैकी सामान्यांंसाठी १६, तर एसटी १, ओबीसी ४, इडब्ल्यूएस १ पदे राखीव आहेत. अकाऊंटंंट पदासाठी वाणिज्य वा कला शाखेत इकोनॉमिक्स विषयासह पदवी, तसेच कोकणीचे ज्ञान सक्तीचे आहे.
कृषी खात्यात २८ पदे भरणार
कृषी खात्यात एक्स्टेंशन ऑफिसरची १२ पदे, पोलीस खात्यात एएसआय (वायरलेस ऑपरेटर) ३ पदे, मेकॅनिक १ (मत्स्योद्योग खाते), कृषी साहाय्यक ५ पदे (कृषी आणि पशुसंवर्धन खाते), इलेक्ट्रिशियन १, साहाय्यक इलेक्ट्रिशियन १, साहाय्यक मेकॅनिक २, साहाय्यक लाईट ऑपरेटर २ पदे, तर हेल्पर (इलेक्ट्रिशियन) १ पद भरण्यासाठी जाहिरात दिली आहे.