लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयिताला जामीन

जीवन साथी संकेतस्थळावर मैत्री करून दाखवले लग्नाचे आमिष

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयिताला जामीन

म्हापसा : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पर्वरी पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपी फ्रेन्को सिक्ष्सास (रा. पर्वरी) याची म्हापसा अतिरिक्त न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केली आहे. जीवन साथी संकेतस्थळावर भेट झाल्यानंतर संशयित आणि त्या ओडिशातील पीडितेची ओळख झाली होती.

वैयक्तिक हमी रक्कम ५० हजार रुपये व तितक्याच रकमेचा हमीदार, पीडित, तिची आई आणि साथीदारांना धमकावण्याचा किंवा आमिष दाखवण्याचा प्रयत्न न करणे, पीडितेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न न करणे, सोशल मीडिया किंवा इतरत्र पीडितेविषयी मजकूर न टाकणे, न्यायालयामच्या परवानगीविना देशाबाहेर न जाणे, यासह इतर अटी न्यायाधीश अपूर्वा नागवेकर यांनी हा जामीन अर्ज मंजूर करताना लागू केल्या आहेत.

संशयित फ्रेन्को सिक्ष्सास यांनी जामीन अर्जासमवेत पाडितेसमवेत सोशल मीडियावर झालेल्या चॅटींगच्या संभाषणाच्या प्रती जोडल्या होत्या. न्यायालयात संशयिताच्यावतीने अॅड. विनायक पोरोब यांनी युक्तीवाद केला व सरकारी पक्षाचे अभियोक्ता आर. बार्रेटो यांचे सर्व कथित आरोप खोडून काढले.

दरम्यान, हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार दि. ८ एप्रिल ते दि. २७ मे २०२५ दरम्यान घडला होता. दि. २६ जून रोजी पीडितेने पर्वरी पोलिसांत तक्रार दिली असता त्याच दिवशी पोलिसांनी संशयिताला अटक केली होती. आपल्या आईची शस्त्रक्रिया असल्याचे सांगून संशयिताने वरील काळात आपल्याला घरी बोलावून घेतले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून पर्वरी तसेच कांदोळीतील एका हॉटेलमध्ये आपल्यावर अत्याचार केलेचा दावा पीडितेने तक्रारीत केला होता. 

हेही वाचा