एमबीबीएस, बी. फार्मसीसह नीट आधारीत अभ्यासक्रमांची गुणवत्ता यादी ३० जुलैपर्यंत होणार जाहीर

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
16th July, 04:36 pm
एमबीबीएस, बी. फार्मसीसह नीट आधारीत अभ्यासक्रमांची गुणवत्ता यादी ३० जुलैपर्यंत होणार जाहीर

पणजी : वैद्यकीय आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रीया अंतिम टप्प्यात असून, नीट परीक्षेवर आधारित एमबीबीएस, बीडीएस, बीएससी नर्सिंग, बीएएमएस आणि बीएचएमएस अभ्यासक्रमांची गुणवत्ता यादी ३० जुलैपर्यंत जाहीर होणार आहे. त्यानंतर १ ऑगस्टपासून प्रवेश फेऱ्यांना सुरुवात होईल, अशी माहिती तांत्रिक शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक प्रदीप कुस्नूर यांनी दिली.

त्यानुसार, संबंधित अभ्यासक्रमांसाठी पात्रता आणि प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक २४ जुलैपर्यंत जाहीर केले जाणार आहे. नीट परीक्षेच्या आधारे होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी केंद्र शासनाची मान्यता आवश्यक असते. केंद्राने यास मान्यता दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होणार आहे.

दरम्यान, फार्मसी (बी. फार्म.) अभ्यासक्रमासाठी नीट आवश्यक नसला तरी यासाठीची पात्रता यादी २४ जुलैपर्यंत आणि गुणवत्ता यादी ३० जुलैपर्यंत जाहीर होईल. एमबीबीएस व बीडीएससारख्या उच्च प्राधान्य अभ्यासक्रमात गुणवत्ता असलेले विद्यार्थी प्रवेश घेतात, त्यामुळे इतर अभ्यासक्रमात नंतर काही जागा रिक्त राहण्याची शक्यता असून त्यानुसार पुढील प्रवेश फेऱ्या राबवण्यात येणार आहेत.

हेही वाचा