गांजा बाळगल्याप्रकरणी शिरगाव येथील एकाला अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
16th July, 04:07 pm
गांजा बाळगल्याप्रकरणी शिरगाव येथील एकाला अटक

पणजी : शिरगाव रेल्वे रुळाजवळ डिचोली पोलिसांनी मंगळवारी रात्री गांजाविरोधी कारवाई करत एका युवकाला सुमारे २० हजार रुपये किमतीच्या गांजासह अटक केली. त्याच्याकडून दुचाकी आणि मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत. प्रजल गावकर (२६, रा. मानसवाडा, शिरगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी रात्री १०.५५ वाजल्यापासून छापासत्र राबवण्यात आले होते. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाकडून अंदाजे २०,८०० रुपये किमतीचा २०८ ग्रॅम गांजा तसेच यामाहा अॅरॉक्स ही दुचाकी व एचएमडी कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी डिचोली पोलीस स्थानकात एनडीपीएस कायद्याच्या कलम २०(ब)(ii)(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. या कारवाईत डिचोली पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अमरनाथ पालनी यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल निलेश फोगेरी, पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र सालसकर, अविनाश गावस, सर्वेश साळगावकर आणि दयेश खांडेपारकर सहभागी झाले होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रश्मीर परब मातोणकर करत आहेत.

हेही वाचा