३०० वृक्ष तोडीच्या प्रस्तावांवर प्राधिकरणाची उद्या बैठक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
16th July, 03:59 pm
३०० वृक्ष तोडीच्या प्रस्तावांवर प्राधिकरणाची उद्या बैठक

पणजीः गोवा राज्य वृक्ष प्राधिकरणाची महत्त्वपूर्ण बैठक १७ जुलै रोजी पर्वरी येथील सचिवालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत दोन मोठ्या प्रस्तावांवर चर्चा होणार असून त्यानुसार सुमारे ३०० झाडे तोडण्याची परवानगी देण्याचा विचार आहे.

पहिला प्रस्ताव फोंडा तालुक्यातील बांदोडा गावातील सर्वे क्र. २२८/१-अ मधील १९५ झाडे तोडण्यासंदर्भात आहे. ही झाडे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या प्रकल्पासाठी तोडण्यात येतील. दुसऱ्या प्रस्तावात तिसवाडी तालुक्यातील चिंबल गावातील सर्वे क्र. ४०/१ मधील ९७ झाडे तोडण्यासंदर्भात आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाचा हा प्रस्ताव आहे.

या बैठकीत वृक्षतोडीला मंजुरी देण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय, पर्यावरणीय परिणामांचा विचार, तसेच वृक्षांच्या पुनर्लागवडीचा आराखडाही चर्चेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा