४३ वर्षांत गोव्यात ४३१ सरकारी प्राथमिक शाळा पडल्या बंद

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
16th July, 03:54 pm
४३ वर्षांत गोव्यात ४३१ सरकारी प्राथमिक शाळा पडल्या बंद

पणजी : विद्यार्थ्यांची घटती संख्या हे सरकारी प्राथमिक शाळा बंद पडण्याचे मुख्य कारण ठरले आहे. यात सर्वाधिक मराठी शाळा बंद पडल्या आहेत. गोवा घटक राज्य झाल्यानंतर आजपर्यंत म्हणजे १९८८-८९ पासून २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षापर्यंत ४३१ शासकीय प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत. शाळा बंद होण्यामागे विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी असणे, सरकारी शाळेच्या जवळच खाजगी शाळांना परवानगी देणे ही मुख्य कारणे आहेत.

शिक्षण खात्याच्या आकडेवारीनुसार, बंद करण्यात आलेल्या बहुतेक शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. अर्थात बहुसंख्य सरकारी प्राथमिक शाळा ह्या मराठीच्याच होत्या आणि आजही आहेत. सरकारी शाळांच्या विलिनीकरणाला पालकांचा विरोध झाल्यामुळे गेल्या दोन दशकांत जास्त शाळा बंद झाल्या. कारण विरोधामुळे विलिनीकरण न झाल्यामुळे ती शाळाच शेवटी बंद करण्याची वेळ शिक्षण खात्यावर आली. 


हेही वाचा