कर्नाटकातील सर्व सिनेमागृहांमध्ये तिकीट दराची कमाल मर्यादा आता २०० रुपये

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
16th July, 10:34 am
कर्नाटकातील सर्व सिनेमागृहांमध्ये तिकीट दराची कमाल मर्यादा आता २०० रुपये

बंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कर्नाटक सरकारने राज्यभरातील सर्व सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमध्ये चित्रपट तिकिटांची कमाल किंमत निश्चित केली असून, कोणत्याही सिनेमाच्या टिकीटांसाठी आता २०० रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारता येणार नाही. या दरांत मनोरंजन कराचा समावेश आहे. 

कर्नाटक सरकारने मंगळवारी जाहीर केलेल्या आदेशानुसार, हा निर्णय राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये त्वरित प्रभावाने लागू होणार आहे. त्यामुळे आता बेंगळुरूसारख्या महानगरांपासून ते लहान गावांपर्यंत कोठेही प्रेक्षकांना २०० रुपयांपेक्षा जास्त दराने तिकीट विक्री करता येणार नाही.

या निर्णयामुळे प्रेक्षकांना दिलासा मिळणार असून, महागड्या तिकिटांमुळे चित्रपट पाहणे टाळणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन मिळेल. विशेषतः सण-उत्सव किंवा आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तिकिटांचे दर प्रचंड वाढवले जात असल्यामुळे अनेकांच्या खिशाला कात्री बसत होती. दुसरीकडे, या निर्णयामुळे थिएटर चालक व मल्टिप्लेक्स मालकांच्या उत्पन्नावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. मात्र, सरकारचा विश्वास आहे की या निर्णयामुळे प्रेक्षकसंख्येत वाढ होईल आणि चित्रपट व्यवसायाला एकूण लाभच होईल.

हा निर्णय लागू करून कर्नाटक राज्याने देशातील काही मोजक्या राज्यांमध्ये स्थान मिळवले आहे, जिथे सामान्य नागरिकांच्या हितासाठी तिकीट दरावर मर्यादा घालण्यात आली आहे. चित्रपटप्रेमींमध्येही या निर्णयामुळे आनंदाची लाट पसरली आहे.



हेही वाचा