पणजी: स्टेनोग्राफर आणि जेएसए परीक्षेत डमी उमेदवार बसवण्याच्या कटाचा पर्दाफाश

बोगस ओळखपत्रामुळे उघड झाला प्रकार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
15th July, 12:23 pm
पणजी: स्टेनोग्राफर आणि जेएसए परीक्षेत डमी उमेदवार बसवण्याच्या कटाचा पर्दाफाश

पणजी : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (एनआयओ) येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीयस्तरावरील स्टेनोग्राफर आणि कनिष्ठ सहाय्यक (जेएसए) परीक्षेदरम्यान डमी उमेदवार म्हणून परीक्षा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पणजी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जणांनी खोटे ओळखपत्र आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे इतर उमेदवारांच्या नावाने परीक्षा लिहिण्याचा प्रयत्न केला. हे दोघेही परीक्षेला बसण्यासाठी केंद्रावर आले असताना परीक्षेपूर्वीच संशय बळावल्याने त्यांना अडवण्यात आले. तपासात त्यांच्याकडे बनावट कागदपत्रे सापडली.  या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून, बनावट कागदपत्रे आणि उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.   

 

( बातमी अपडेट होत आहे )