बार्देशमधील १९ वर्षीय युवक अटकेत
पणजी : वागातोर येथील एका रिसॉर्टमध्ये डिचोली तालुक्यातील महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर करण्यात आले. तसेच तिच्या सोनसाखळीची चोरी केल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी बार्देश तालुक्यातील एका १९ वर्षीय युवकाला अटक केली आहे.
हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, १९ वर्षीय युवकाने महिलेला मार्च २०२५ मध्ये वागातोर येथील एका रिसॉर्टमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर पीडित महिला गरोदर झाली. तसेच संशयित युवकाने पीडित महिलेची सोनसाखळी चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी हणजूण पोलीस स्थानकाचे निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक लिशा खर्बे यांनी संशयित युवकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ आणि ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुरुवारी रात्री १९ वर्षीय संशयित युवकाला अटक केली.