न्यायालयीन कर्मचाऱ्याची आंबेली-सत्तरी येथे आत्महत्या

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th July, 11:41 pm
न्यायालयीन कर्मचाऱ्याची आंबेली-सत्तरी येथे आत्महत्या

वाळपई : पर्ये सत्तरी येथील संजीव पुंडलिक राणे या तरुणाने आंबेली सत्तरी येथे बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. संजीव राणे हा म्हापसा येथील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कर्मचारी होता. वाळपई पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह बुधवारी संध्याकाळी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. गुरुवारी सकाळी उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

संजीव हा म्हापसा येथील सत्र न्यायालयामध्ये कामाला होता. मात्र, त्याने आंबेली येथे जाऊन आत्महत्या का केली? या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चारचाकी वाहन रस्त्याच्या बाजूला उभे करून त्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

पोलीस निरीक्षक विद्देश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा केला. उपनिरीक्षक सोहम मलिक अधिक तपास करीत आहेत. संजीव याच्यावर गुरुवारी संध्याकाळी शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. 

हेही वाचा