अखिल गोवा टेबल टेनिस स्पर्धेत इशान - आशिष आमनेसामने

मुलांच्या एकेरी गटात अंतिम सामना : मुलींच्या गटात तिशा, साचीही अंतिम फेरीत दाखल

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th July, 07:43 pm
अखिल गोवा टेबल टेनिस स्पर्धेत इशान - आशिष आमनेसामने
🏓
🔥 अखिल गोवा मेजर मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीची तयारी
🏆 अंतिम फेरीचे खेळाडू
११ वर्षांखालील मुले
इशान कुलासो
इशान कुलासो
अव्वल मानांकित
अशांक दळवी
अशांक दळवी
सरळ सेट विजेता
१३ वर्षांखालील मुली
तिशा शेख
तिशा शेख
बिगरमानांकित विजेती
साची देसाई
साची देसाई
बिगरमानांकित विजेती
फोंडा टीटी स्पोर्ट्स क्लबने पणजी येथील क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या या स्पर्धेत इशान कुलासो आणि अशांक दळवी यांच्यात ११ वर्षांखालील मुलांच्या एकेरी गटात अंतिम सामना रंगणार आहे. दोघांनीही सर्व सामने सरळ सेट्समध्ये जिंकले.
मुलींच्या गटात अनपेक्षित निकाल
१३ वर्षांखालील मुलींच्या गटात बिगरमानांकित खेळाडू तिशा शेख आणि साची देसाई यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. तिशाने अव्वल मानांकित आयुषी आमोणकरला ३-२ ने हरवले, तर साचीने दुसऱ्या मानांकित आर्ना लोटलीकरला त्याच फरकाने पराभूत केले.
🎯 स्पर्धेतील महत्त्वपूर्ण लढती
आरिश शेखने तिसऱ्या मानांकित केदार नायरला ३-० ने धक्का दिला
श्रेयष्ट राणेने विवान ससमलला ३-२ अशा रोमांचक लढतीत हरवले
आर्ना लोटलीकरने समैरा वेर्लेकरवर ३-२ असा निसटता विजय मिळवला