‘जेसीआय’कडून निवड : आशिया पॅसिफिक विभागात लक्षवेधी कामगिरी
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) आशिया पॅसिफिक विभागातील प्रभावशाली व्यक्ती म्हणून ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल, इंडियाकडून (जेसीआय) निवडण्यात आले आहे.
अन्य मान्यवरांत गेरा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष जेसी कुमार गेरा, खासदार अनिल बोंडे, जेसी शाईन भास्करन, जेसी कवीन कुमार कुमारवेल, जेसी सुनील कुमार आर, जेसी एएमएसजी अशोकन आणि जेसी रविशंकर यांचा समावेश आहे.
डॉ. सावंत यांचा जेसीआयसोबतचा प्रवास २००७ मध्ये जेसीआय उसगावचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सुरू झाला. नंतर त्यांनी जेसीआय साखळीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. येथे ते अजूनही संलग्न आहेत. स्वयंपूर्ण गोवा, कोविड-१९ साथीच्या काळातील समर्थ नेतृत्व, सार्वजनिक आरोग्य आणि कल्याणावरील त्यांचे सक्रिय प्रशासन यासाठी मुख्यमंत्री ओळखले जातात.
१७ व १८ जुलै रोजी जेसीआय फिलीपिन्सच्या ११०व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाईल.