पेडण्यातील युवकांनी केले बाबू आजगावकरांच्या पुतळ्याचे दहन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
5 hours ago
पेडण्यातील युवकांनी केले बाबू आजगावकरांच्या पुतळ्याचे दहन

पेडणे : माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा पेडण्यातील युवकांनी निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे पेडणे बाजारपेठेत दहन केले.

पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यावर बाबू आजगावकर यांनी आक्षेपार्ह विधाने केली. त्या विधानाचा जाहीर निषेध पेडणे मतदारसंघातील युवकांनी त्यांचा पुतळा जाळून शुक्रवारी सायंकाळी पेडणे बाजारपेठेत केला.

सिद्धार्थ पोळजी म्हणाले की, बाबू आजगावकर यांनी पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांना अपशब्द वापरला. बाबू आजगावकर यांचे राजकारण खूप जुने झाले आहे. ते आता पेडणेत चालणार नसल्याचाही त्यांनी इशारा दिला.

रणजीत परब यांनी प्रवीण आर्लेकर यांचे पेडणे मतदारसंघात चांगले काम सुरू आहे. माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी आमच्या आमदारावर विनाकारण टीका केली आहे. त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. ते भारतीय जनता पक्षाचे चांगले काम करीत आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांचा अभिमान असल्याचे सांगितले.

धारगळ येथील युवकावर अॅसिड हल्ला झाला. याबाबत पेडणे पोलिसांनी आठ तासांत संशयित आरोपीला पकडले. पोलिसांवर विनाकारण बाबू आजगावकर आरोप करीत आहेत. आमदार प्रवीण आर्लेकर हे चांगले काम करत असून आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे रणजीत परब यांनी सांगितले. 

हेही वाचा