गोवा पोलीस : गोव्यात २ ते ५ जुलैदरम्यान वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd July, 11:08 am
गोवा पोलीस : गोव्यात २ ते ५ जुलैदरम्यान वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम

पणजी : राज्यात वाहतूक शिस्त आणि रस्ता सुरक्षा नियमांची होणारी पायमल्ली रोण्यासाठी वाहतूक विभागाने विशेष मोहीम हाती घेतली असून, २ जुलैपासून ५ जुलै २०२५ पर्यंत दररोज सकाळी ९ ते १ आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ही मोहीम राबवली जाणार आहे. या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी दिली.

या मोहिमेदरम्यान, परवाना नसलेले वाहनचालक, अल्पवयीन चालक, हेल्मेट न घालणारे, दुचाकीवर अतिरिक्त प्रवासी घेणारे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणारे, वेगमर्यादा ओलांडणारे, मॉडिफाईड सायलेन्सर वापरणारे, खाजगी वाहने व्यावसायिक वापरासाठी देणारे, नो-एंट्री झोनमध्ये प्रवेश करणारे, चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क करणारे आणि सिग्नल तोडणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

या कारवाईदरम्यान पोलिस अधिकाऱ्यांना बॉडी कॅमेरे वापरणे बंधनकारक असणार असून, सर्व कारवायांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते दैनिक अहवालात नमूद करणे आवश्यक आहे. पोलीस निरीक्षकांना प्रत्यक्ष क्षेत्रात राहून कारवाई करावी आदेश देण्यात आले असून, संबंधित विभागीय पोलीस उपअधीक्षकांना संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वाहतूक शिस्तीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणारी ही मोहीमेला यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा